पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

४०

अप्सरा मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला
-------- रावांचे गुण बघून अर्पण केली मला

४१

तारामती राणी, हरिशचंद्र राजा, रोहिदास पुत्र

-------- रावांच्या नावाने घातले मंगळसुत्र

४२

वाद्यामध्ये सुरेल वाद्य म्हणते बिन
-------- रावांच्या चरणी -------- बाई लीन

४३

संगमरवरी देवळात बसविली रामाची मुर्ती
-------- रावांशी लग्न झाले झाली इच्छापुर्ती

४४

शिवाजीसारखा पुत्र, जिजाबाईसारखी माता
-------- रावांचे नाव घेते आपणा सर्वांकरीता
४५ आधी घातला चंद्र्हार, मग घातली ठुशी
-------- रावांचे नाव घ्यायला माझी नेहमीच खुशी
४६ आपल्या देशात व्हावयाचा आपल्या भाषेचा मान
-------- रावांचे नाव घेते ऐका देऊन कान
४७ देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले
-------- रावांशी लग्न होऊन मनोरथ पुर्ण झाले
४८ विवेकी लोकांच्या समुदयात विद्वांनाचा मान
-------- रावांचे नाव घेते ऐका देऊन कान
४९ सासर-माहेर घराणे आहे कुलीन
-------- रावांच्या सहवासात मी राहीन लीन
५० स्त्रीला भुषविते तिची शालीनता
-------- रावांच्या सहवासात करीन कर्तव्यतत्परता
५१ सागर मिलनास उत्सुक होते सरिता
-------- रावांच्या जीवनात सौभाग्याची पुर्तता
५२ रुप गुण संपदेच्या जोडीला हवे चारित्र्य
-------- रावांच्या नावात आहे पावित्र्य
५३ अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान
-------- रावांच्यामुळे मिळाला सौभाग्याचा मान
५४ सडा समार्जनाबरोबर तुळशीला घालावे पाणी
-------- रावांचे नाव घेते जमल्या सा-या मैत्रिणी
५५ प्रभात समय सुखावतो गाता भुपाळी
-------- रावांचे नाव घेते -------- च्या वेळी
५६ संध्या समयास आतुरलेले जीव घरी घेतात धाव
सर्वांच्या आग्रहास्तव घेते -------- रावांचे नाव
५७ मनाला समाधान देते देवापुढची सांजवात
संसाराच्या सुखी वाटचाली करीता -------- रावांच्या हाती दिला हात
५८ तिळगुळाच्या देवघेवीनं द्रुढ होतं प्रेमाचं नातं
-------- रावांचे नाव घेते आज आहे मकर सक्रांत
५९ तिळाची माया गुळाची गोडी
परमेश्वरा सुखी ठेव -------- राव नी माझी जोडी